मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०१०

॥ पुनरागमनायच ॥

कधी काळी गरम होता चहा
धगधगती ज्वाळा तप्त-संतप्त लोहा
अंगात होती रग - पारा शंभरावर सहा!

[परंतु कालपरत्वे]
कशी अचानक पडली थंडी - पहा
गोठली अक्षरे कल्पनांचा दुष्काळ महा
ठिणगी क्वचित आता सगळाच हशा - हाहा!

[उपसंहार]
कर्कश्श वाटते शांतता - असह्य प्रतिभा विरह हा
घे लेखणी हाती - फुटू देत धरण पुन्हा
परततोय मी आता - रसिकांनो, सावध रहा!

४ टिप्पण्या:

Harshad म्हणाले...

Nice to read that!

Milind म्हणाले...

"रसिकांनो, सावध रहा!"
-विशेष आवडले!
:) :)

Nandan म्हणाले...

वेलकम ब्याक. बाकी, मिलिंदशी सहमत आहे ;)

Salil Chaudhary म्हणाले...

mAst lihilay

Very good :-)

Salil Chaudhary
http://www.netbhet.com